मंगरुळनाथ,
abducting-a-minor-girl : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याच्या संशयावरून मंगरुळनाथ पोलिसांनी ३१ जुलै रोजी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या साडूची मुलगी ३० जुलै रोजी दुपारी मोबाइल दुरुस्त करून आणण्याचे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तक्रारीनुसार, संबंधित मुलगी तालुयातील एका गावातील युवकाशी मोबाइलवर वारंवार संपर्क होत होता. मुलीच्या वडिलांनी यापूर्वी आरोपीला मुलीशी फोनवर संपर्क ठेवू नये, अशी समज दिली होती. मात्र, आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.