भारतीय सीमेजवळ चीनच्या हालचाली

दोन हवाई तळांवर लढाऊ विमाने तैनात केल्याचा दावा

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
indian-border : चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर सर्वात आधुनिक जे-२० स्टील्थ लढाऊ विमाने आपात्कालीन परिस्थितीत तैनात केले आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या नवीन छायाचित्रांमध्ये ही माहिती समोर आली आहेत.
 

Indian border, China, 
 
 
 
छायाचित्रांनुसार, शिंजियांगमधील होटान हवाई तळावर ८ आणि तिबेटमधील डामशुंग हवाई तळावर ४, अशी एकूण १२ जे-२० विमाने चीनने तैनात केली आहेत. अलीकडच्या वर्षांत प्रत्यक्षे नियंत्रण रेषेजवळ लढाऊ विमानांच्या सर्वात मोठ्या तैनातींपैकी ही एक मानली जात आहे. व्यावसायिक उपग्रह कंपनी व्हेंटरने ९ जुलै रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये होटान हवाई तळावर ८ जे-२० ‘मायटी ड्रॅगन’ स्टील्थ लढाभ विमाने मोकळ्या एप्रनवर उभे असलेले दिसले. तर, २५ जूनच्या छायाचित्रांमध्ये डामशुंग हवाई तळावर ४ जे -२० विमाने संरक्षणात्मक निवाऱ्याखाली (शेल्टर) दिसली. या छायाचित्रांवरून असे संकेत मिळतात की, चीनने नियंत्रण रेषेजवळ आपल्या सर्वात आधुनिक लढाऊ विमानांची उपस्थिती वाढवली आहे.
सीमेपासून दोन्ही हवाई तळ किती जवळ ?
 
होतान हवाई तळ भारताच्या दौलत बेग ओल्डी हवाई तळापासून सुमारे २४५ किलोमीटर आणि लेहपासून सुमारे ३८९ किलोमीटर दूर आहे. तर, डामशुंग हवाई तळ अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून सुमारे ३४४ किलोमीटर वायव्येस स्थित आहे. हे दोन्ही हवाई तळ भारत-चीन सीमेच्या पश्चिम आणि पूर्व सेक्टरमध्ये चीनच्या वायुसेनेचे सर्वात महत्त्वाचे फॉरवर्ड बेस मानले जातात.
  
पाळत ठेवणाऱ्या ड्रोनची तैनाती
 
 
सुमारे ३७०० मीटर लांब धावपट्टीमुळे, येथे मोठे आणि जड लष्करी विमानांचे सहजपणे उड्डाण करता येते. हवाई तळावर मजबूत विमान निवारा (एअरक्राफ्ट शेल्टर), नवीन एप्रन आणि आधुनिक ऑपरेशन सपोर्ट सुविधा उपलब्ध आहेत. येथे जे-२० स्टील्थ फायटर जेट व्यतिरिक्त केजे-५०० एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान, इंटरसेप्टर फायटर जेट आणि सीएच-३ पाळत ठेवणारे व हल्ला करणारे ड्रोन (निगरानी एवं स्ट्राइक ड्रोन) देखील तैनात आहे. येथे एच-६ रणनीतिक बॉम्बर विमानांची देखील तैनाती केली आहे