आता ईव्हीएमवर दिसणार नेत्यांचे रंगीत फोटो

निवडणूक आयोगाने केले अनेक बदल

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |

 

डेहराडून
evm मतदारांना उमेदवार ओळखता यावे, या दृष्टीने निवडणूक आयाेगाने काही बदल केले आहे़त जेव्हा तुम्ही मतदान कराल, तेव्हा तुम्हाला ईव्हीएमवर तुमच्या नेत्यांचे रंगीत फोटो दिसणार आहेत़ इतकेच नाही, तर राजकीय पक्षांचे बुथ आता मतदान केंद्रापासून २०० मीटरऐवजी केवळ १०० मीटर अंतरावर दिसेल़ हे बदल उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येतील.

evm 
 
 
evm आतापर्यंत ईव्हीएमवर उमेदवारांचे छोटे, कृष्णधवल फोटो असायचे. यापैकी अनेक फोटो मतदारांना गोंंधळात टाकणारे होते़ त्यामुळे मतदारांना आपला उमेदवार ओळखणे कठीण जात असे. यावेळी निवडणूक आयोगाने एक मोठा बदल केला आहे. मतदारांना आपला पसंतीचा उमेदवार ओळखण्यात कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी आता ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर उमेदवारांचे स्पष्ट रंगीत फोटो लावले जाणार आहे़त.
 
उमेदवारांचे बुथ असणार १०० मीटर अंतरावर

evm आतापर्यंत अनेक राज्यांत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक निर्बंधांसह उमेदवारांचे बुथ मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर ठेवले जात होते. निवडणूक आयोगाने यातही मोठा बदल केला आहे. आता उमेदवारांचे बुथ मतदान केंद्रापासून केवळ १०० मीटर अंतरावरच असेल़ तथापि, सामानासंबंधीचे इतर नियम अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहायक मुख्य निवडणूक अधिकारी मस्तू दास यांनी दिली़.

 
डिजिटल क्रांती, प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंग
evm निवडणूक आयोगाने ४० हून अधिक मोबाईल आणि वेब ॲप्स ‘ईसीआय नेट’ नावाच्या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित केले आहेत़ त्यामुळे अधिकारी आणि नागरिक दोघांचेही काम सोपे झाले आहे. पारदर्शकता राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी राज्यभरातील १०० टक्के मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंग उपलब्ध करून दिले जाईल़ त्यामुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.