वर्धा-इरईच्या पुरामुळे चंद्रपूर जलमय

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर,
floods-in-wardha-and-irai-rivers : पूर्व विदर्भात तीन दिवस पाऊस बरसला. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला असून, या नदीचे ‘बॅकवॉटर’ इरई नदीत शिरले. त्यामुळे इरईची पाणी पातळी वेगाने वाढून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रपूर महानगराच्या बाह्य भागातील बिनबा गेट, रहमत नगर आणि परिसरात पुराचे पाणी शिरले. महानगराचा जवळपास एक संपूर्ण भाग जलमय झाला आहे.
पुरात अटकलेल्या रहमत नगर येथील 3 नागरिकांचे ‘रेस्क्यू’ करण्यात आले आहे. तर 30 नागरिकांना शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शाळेत सुरक्ष्तिरित्या स्थलांतरित केले गेले आहे. आरवट गावातील सहारा पार्क येथील निवासी भागातील घरामध्येही पुराचे पाणी शिरल्याने 40 कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
 
 

k 
 
 
 
पुराच्या पाण्यामुळे चारवट-माना-चंद्रपूर हा मार्ग बंद झाला आहे. तसेच आरवट ते पठाणपुरा, बिनबा ते चोराडा, हिंगनाळा ते मारडा, पांढरकवडा ते वढा, आरवट ते शिवनीचोर, वढा ते उसगाव, पिपरी ते वेंढली, धानोरा ते भोयगाव, हिंगनाळा ते मारडा, आरवट ते पठाणपूरा, चोराळा ते बिनाबा गेट, पांढरकवडा ते उसगाव या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. वर्धा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता राजुरा-बामणी (बल्लारपूर) रस्ता बंद करण्यात आला आहे.