वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

*व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील घटना

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
सावली,
tiger-attack : वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा नियत क्षेत्र कक्ष क्रमांक 1501 मधील नागोबा देवस्थानालगत घडली. हिरामण मारखंडी साखरे (75, रा. सामदा) असे मृतक गुराख्याचे नाव आहे.
 

km 
 
हिरामन साखरे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास धानपिकाच्या रोवणीसह गुरे राखीत असताना नागोबा देवस्थाना सोनापूर नवतलाव परिसरात वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभाग व पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
 
 
सध्या तालुक्यात धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. पहाटेपासूनच शेतकरी, शेतमजूर, महिला तसेच अनेक ठिकाणी लहान मुलेही शेतात कामासाठी जात असतात. विशेष म्हणजे, या भागात गेल्या काही महिन्यांपासून रानटी हत्तींच्या कळपामुळे मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील भागात नियमित गस्त, पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, सतर्कता पथके आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.