स्व. मोहम्मद रफी यांना स्वरसुमनांजली

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Mohammed Rafi स्थानिक सूर मिलन ग्रुप तर्फे मेलोडी स्टार स्टुडिओ येथे ज्येष्ठ पार्श्वगायक स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात रसिकांसमोर सादर करण्यात आला.

rafi 
 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात 'प्रभू तू दयाळू' या भजनाने झाली, तर समारोप 'शोधिसी माधवा' या भक्तिगीताने झाला. कमलेश टहिल्यानी, निखिल वझलवार, मकरंद बक्षी, आनंद देव, सचिन जहागिरदार, जयदीप साठे, राजेश झाडे, विवेक पाध्ये, सुहास कुलकर्णी, चंद्रहास बल्लाळ, राजू जिचकार, विद्याधर बक्षी, राजेश महाजन आणि अभय पांडे यांनी मो. रफी यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळविली.कार्यक्रमाचे आयोजन मकरंद बक्षी यांनी केले. व्हिडिओ व ध्वनी संयोजन दुर्गेश जेसवानी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही मकरंद बक्षी यांनी केले.
सौजन्य: कल्पना वाराणशीवर,संपर्क मित्र