मोदी म्हणाले, ‘सर्वांना माफ करतो’

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Prime Minister Modi's reaction दिल्लीतील जंतर-मंतर येथे २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या १५ वर्षीय रुचिका सिंग हिचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हात जोडून देशाची माफी मागितली असून, आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन आपण चुकीचे वक्तव्य केल्याचे कबूल केले आहे. तसेच ही आपली पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.
 
 
 
सझडफ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुचिका सिंगने सांगितले की, कनॉट प्लेस येथे गेल्यानंतर ती मित्रांसह जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झाली होती. तेथील वातावरण आणि उपस्थितांच्या प्रभावामुळे पंतप्रधानांविरोधात अयोग्य भाषा वापरली गेली, याबद्दल तिला आता पश्चात्ताप होत असल्याचे तिने म्हटले आहे.दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरील संवादात आंदोलनादरम्यान स्वतःविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविरोधात वापरण्यात आलेली भाषा वेदनादायक असल्याचे नमूद केले. मात्र, तरुणांना त्यांच्या चुकांमधून सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना माफ केल्याचे स्पष्ट केले.
 
 
या प्रकरणात २९ जुलै रोजी नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिका सिंगविरोधात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला होता. पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणे, घटनात्मक पदाचा अवमान करणे आणि जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार नोंदवलेला हा गुन्हा नंतर दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका सिंग नोएडातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये तिच्या आईसोबत राहत होती. आंदोलनानंतर ती घरी परतली नसल्याची माहिती सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिली असून, पोलिसांनी सोसायटीत जाऊन रहिवाशांकडे चौकशीही केली. या प्रकरणावर आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या कॉकरोच जनता पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आक्षेपार्ह भाषेचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, अशा प्रकारच्या वक्तव्यांसाठी फौजदारी गुन्हा दाखल करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोणाला आक्षेप असल्यास मानहानीचा दावा करता येऊ शकतो, परंतु अशा प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई टाळली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.