झाडगाव, दिग्रज येथे खड्ड्यांत बसुन आंदोलन

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
वर्धा,
protest-by-sitting-in-pits : झाडगाववर्धा मार्गावरील अत्यंत खराब व जीवघेण्या खड्ड्यांच्या निषेधार्थ ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजत दिग्रज गावाजवळ समृद्धी महामार्ग दिग्रज येथे खड्ड्यांत बसुन, हार घालून ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केले.
 
 

protest-by-sitting-in-pits
 
 
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याने शासन आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी खड्ड्यांना हार घालून प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात शेतकरी, युवक, विद्यार्थी, वाहनचालक तसेच झाडगाव व दिग्रज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
झाडगाव-वर्धा मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.