वर्धा,
rajesh-bakane : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान हे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरत असून, प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून प्रत्येक अर्जदाराला न्याय मिळेल असा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आमदार राजेश बकाने यांनी केले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन येथे आज १ रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, संजय गांधी निराधार समिती वर्धा ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, वर्धा शहरचे सौरभ देशमुख, सेलूचे अशोक कलोडे आदी उपस्थित होते.
आ. बकाने पुढे म्हणाले, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या समाधान शिबिरांमुळे हजारो नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागल्या आहेत. जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकार्यांनी गावागावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, ही बाब कौतुकास्पद आहे. सध्या सुमारे ८० टक्के अर्जांचा निपटारा होत असला तरी तो १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री त्या व्यक्तीची सुरक्षित सुटका केली. अशा तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या की, महाराजस्व अभियानाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून झाली असून या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १ लाख ५० हजार लाभाथ्र्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला आहे. यावेळी त्यांनी महसूल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचार्यांना शुभेच्छाही दिल्या.
आशिष कुचेवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात ४ हजार ५१९ लाभाथ्र्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी आ. राजेश बकाने व मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन ज्योती भगत यांनी केले.