नागपूर,
Ramkrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारे संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. किरण पांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
प्रा. झगडे यांनी महापुरुषांच्या विचारांचा आणि त्यागाचा इतिहास जाणून घेण्याची गरज व्यक्त केली. प्रा. दीपक ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला, तर प्रा. किरण पांडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक व जनजागृतीच्या कार्याचा आढावा घेतला.संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. मारोती वाघ व संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पुनम मेश्राम, सूत्रसंचालन प्रा. पदमा वाळके, तर आभार प्रा. अश्विनी नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र