मुंबई
rashmika mandanna दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. आगामी मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना एका धोकादायक अपघातात ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर तिच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अवघड डान्स सिक्वेन्स आणि हाय-ऑक्टेन अॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण सुरू असताना रश्मिका जखमी झाली. हा अपघात अचानक घडल्याने काही काळ शूटिंग सेटवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत रश्मिकाच्या कंबरेच्या खालच्या भागातील टेंडन पूर्णपणे डिटॅच झाल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गंभीर दुखापत प्रामुख्याने व्यावसायिक खेळाडूंना किंवा अत्यंत शारीरिक मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना होत असते. सलग कठीण डान्स स्टेप्स आणि अॅक्शन सीन्समुळे तिच्या स्नायूंवर मोठा ताण आल्याने ही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.दुखापतीची तीव्रता लक्षात घेता डॉक्टरांनी रश्मिकाला पुढील सहा आठवडे, म्हणजेच सुमारे दीड महिना पूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा शारीरिक rashmika mandanna ताण टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, योग्य उपचार आणि नियमित फिजिओथेरपीद्वारे तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.रश्मिका सध्या ‘रणबली’ आणि ‘मैसा’ या बहुचर्चित चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र, या अनपेक्षित दुखापतीमुळे संबंधित चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, निर्मात्यांसमोरही नव्याने शूटिंगचे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.दरम्यान, चित्रपटांच्या टीमकडून रश्मिकाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपचार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर ती पुन्हा नव्या जोमाने आणि दुप्पट उत्साहाने शूटिंग सेटवर परतेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.