नागपूर,
Sevasadan Education Institute सेवासदन शिक्षण संस्था, नागपूरद्वारे संचालित श्री देवी पद्मावती सेवासदन अध्यापक विद्यालय तसेच यशोदाबाई खरे सेवासदन अध्यापक विद्यालय येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अध्यापन व्यवसायातील जबाबदारी, मूल्याधिष्ठित शिक्षण, गुणवत्ता आणि शिक्षकांची समाजाप्रती असलेली भूमिका यावर प्रेरणादायी विचार मांडले.

यावेळी संस्थेच्या सचिव वासंती भागवत, उपाध्यक्ष मा. बापू भागवत, पालक संचालक मा. ॲड. उमेश अंधारे, तसेच संस्थेचे पदाधिकारी, डॉ. सुधीर दळवी व नीता देव हे दोन्ही अध्यापक विद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात कांचन गडकरी यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधून आदर्श शिक्षक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
सौजन्य:बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र