रेल्वे सुरक्षेला प्राधान्य; 'कवच' प्रणालीची पाहणी

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नागपूर,
South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी नागपूर विभागाचा दौरा करून इतवारी–कन्हान–कामठी रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्था, 'कवच' प्रणाली आणि विविध विकासकामांचा आढावा घेतला.
 
 

big 
 
 
दौऱ्यात त्यांनी कन्हान स्थानकावरील सिग्नल व दूरसंचार उपकरणांची पाहणी केली तसेच 'कवच' प्रणालीने सुसज्ज लोकोमोटिव्हच्या चाचण्यांचे निरीक्षण केले. कामठी स्थानकावरील प्रवासी सुविधा आणि विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला.नागपूर विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत 'कवच' प्रकल्प, स्थानक विकास, रोड ओव्हर ब्रिज, सिग्नल व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेऊन सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
सौजन्य :डॉ. प्रवीण डबली ,संपर्क मित्र