मुंबई
२०२६ मधील सर्वाधिक चर्चेत आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’ने प्रदर्शना आधीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. नॅचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात ‘आया शेर’ हे गाणे आधीच ब्लॉकबस्टर ठरले असून, चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडिओही त्याच्या बोल्ड आणि रॉ शैलीमुळे विशेष चर्चेत राहिला होता. विशेषतः मुख्य पात्राला वेश्येचा मुलगा म्हणून संबोधले जाणे आणि तीच ओळख त्याच्या हातावर कोरलेली दाखवण्यात आल्याने या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित टीझरबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, तो ६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ‘द पॅराडाइज’ची सातत्याने चर्चा सुरू आहे. नानीच्या दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल मटेरियल आणि शक्तिशाली संगीतामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘दसरा’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने ‘द पॅराडाइज’ला २०२६ मधील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांमध्ये स्थान मिळाले आहे.दरम्यान, चित्रपटातील ‘आया शेर’ या गाण्याने यूट्यूबवर २० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे गाणे केवळ लोकप्रियच ठरले नसून, एक सांस्कृतिक फिनॉमेनन म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे. या गाण्याला यूट्यूबवर तब्बल १८ लाख लाइक्स मिळाले असून, प्रेक्षकांमधील त्याच्या अफाट लोकप्रियतेची हीच साक्ष मानली जात आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडियापर्यंत ‘आया शेर’ची जबरदस्त क्रेझ कायम असून, त्यामुळे ‘द पॅराडाइज’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या टीझरकडे लागले असून, तो ६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा टीझर आतापर्यंतची सर्वात धक्कादायक झलक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, चित्रपटाचा बोल्ड आणि रॉ अंदाज अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल, अशी अपेक्षा आहे.
दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टीझरची दमदार झलक शेअर करत, “द पॅराडाइजचा टीझर ६ ऑगस्ट” असे लिहून टीझरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही झलक शेअर करत, “१ मिनिट ३५ सेकंदांचा वेडेपणा तयार आहे. #TheParadise चा टीझर ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार. जादल ज़माना साठी सज्ज व्हा,” असे म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
एसएलव्ही सिनेमाजच्या the paradise teaser बॅनरखाली तयार झालेला ‘द पॅराडाइज’ हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण आठ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जागतिक प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपट सादर करण्यासाठी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहितीही समोर आली आहे. दमदार दिग्दर्शन, प्रभावी स्टारकास्ट आणि भव्य सिनेमॅटिक दृष्टिकोनाच्या जोरावर ‘द पॅराडाइज’ हा केवळ एक चित्रपट न राहता, प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.