शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवा : आ. श्याम खोडे

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
वाशीम,
shyam-khode : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी केले.
 
 

jik 
 
 
 
विधानसभा क्षेत्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर सांस्कृतिक भवन, मानोली रोड, मंगरूळनाथ येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते. शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, सहकार, नगरपरिषद, कामगार, पुरवठा आदी विविध विभागांच्या योजनांद्वारे जवळपास ११०० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला.
 
 
कार्यक्रमास नगराध्यक्ष अनिल केंदळे, नगराध्यक्ष अशोक परळीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, सुरेश लुंगे, सुरेश मापारी, चक्रधर गोटे, उपनगराध्यक्ष अनिल गावंडे, रवी पाटील ठाकरे, सुदर्शन धोटे, अभिषेक दंडे, विनोद जाधव, पांडुरंग कोठाळे, नगरसेवक गणेश खोडे, नगरसेवक आर. के. राठोड, प्रा. वीरेंद्र ठाकूर, प्रा. सुधीर घोडचर, श्रीहरी इंगोले, प्रा. नंदलाल पवार, सुनील मालपाणी, डॉ. सुभाष नानोटे, तहसीलदार निलेश पळसकर, तहसीलदार सुधाकर अनासुने, गटविकास अधिकारी सोनवणे, गटविकास अधिकारी कारले, तालुका कृषी अधिकारी जावळे, तालुका कृषी अधिकारी इंगोले, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था एम. एस. लटपटे, जगदीश देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी, यंत्रणाप्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
शिबिरात सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमण नियमाकूल प्रकरणांचा निपटारा, वर्ग-दोन ते वर्ग-एक रूपांतरण, डिजिटल सातबारा, वारसहक्क फेरफार, उत्पन्न दाखले, नवीन शिधापत्रिका, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, फेरीवाला विक्री प्रमाणपत्रे, आभा कार्ड, सुरक्षित मातृत्व योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, कामगार कल्याण मंडळ नोंदणी, कृषी विभागामार्फत बियाणे, फळबाग लागवड, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पंपसंच आदी विविध योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.
 
 
शिबिरस्थळी विविध विभागांनी माहिती व सेवा कक्ष उभारून नागरिकांना योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी रवी काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रीती मेहकरकर यांनी, तर आभार नायब तहसीलदार रवी राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाशिम व मंगरूळपीर तालुयातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.