‘व्हिजन गडचिरोली 2047’ कार्यशाळेसाठी मान्यवरांना निमंत्रण

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
vision gadchiroli विकसित गडचिरोली जिल्ह्याची दीर्घकालीन विकासदृष्टी निश्‍चित करण्याच्या उद्देशाने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून ‘व्हिजन गडचिरोली 2047’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 16 व 17 ऑगस्ट रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. या कार्यशाळेसाठी डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, सहपालकमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण दिले आहे.
 

vision gadchiroli 2047 workshop to shape district development roadmap 
या कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्‍वत विकासासाठी 2047 पर्यंतचा विकास आराखडा कसा असावा, यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच दैनिक, टीव्ही आणि पोर्टल पत्रकार यांच्या सहभागातून विचारमंथन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेचे निमंत्रण गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना देण्यात आले. तसेच त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनाही कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी, वनसंपदा, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, आदिवासी विकास, सिंचन, वाहतूक तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी या विविध विषयांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
2047 पर्यंत विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर गडचिरोली घडविण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे विकासाची दिशा ठरवावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीच्या भविष्यासाठी व्यापक लोकसहभागातून तयार होणारा ‘व्हिजन गडचिरोली 2047’ हा विकासाचा दिशादर्शक आराखडा ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.