हिंगणघाट,
vrukshamitra parivar आज पर्यावरण धोक्यात येत असताना झाडं लावून त्याचे संवर्धन करण्याची मोठी गरज आहे. वृक्षमित्र परिवार हे काम मोठ्या निष्ठेने काम करीत असून त्यांच्या कार्याला नपच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी दिले.
वृक्षमित्र परिवाराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रॉयल पार्क येथे आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर न. प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, प्रा. स्मिता बोडे, माजी नगरसेवक शुभांगी डोंगरे, वनश्री दिगांबर खांडरे, पतंजलीचे वसंत पाल, निसर्ग साथीचे प्रा. प्रभाकर कोळसे, सामाजिक कार्यकर्ते आकाश पोहाणे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त शशांक खांडरे, नपच्या वृक्षप्राधिकरणचे अधिकारी विशाल ब्राह्मणकर, प्रवीण काळे व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मदतीचा हात समोर करणारे महेश घुमडे व निलेश मुनोत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. स्मिता बोंडे, दिगंबर खांडरे, प्रा. प्रभाकर कोळसे, वसंत पाल, निलेश ठोंबरे व शुभांगी डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सतीश वखरे यांनी केले. संचालन गोपाल मांडवकर व आभार प्रदर्शन संजय अवचट यांनी केले.