६ लाख ७५ हजार रुपयांचे ६ टन लाडू साहित्य संत गजानन चरणी अर्पण

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
वर्धा,
wardha शहरातील गजानन महाराज भतांच्या वतीने सात वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूपूजन म्हणून शेगाव येथे संत गजानन महाराज चरणी प्रसाद लाडू साहित्य अर्पण करण्यात येत आहे. यावर्षी ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे जवळपास ७ टन प्रसाद लाडू साहित्य संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे पाठवण्यात आले.
 

sant gajanan maharaj shegaon, wardha devotees, guru purnima celebration, laddu prasad donation, gajanan maharaj temple shegaon, wardha news, religious news maharashtra, guru seva initiative, 7 tonnes laddu material, gajanan maharaj bhakt, maharashtra devotional news 
वर्धेतील गजानन भत ७ वर्षांपासुन संत गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे गुरुपौणिमेनिमित्त गुरुसेवा म्हणून लाडू साहित्य पाठवण्याचा उपक्रम राबवत आहेत. जवळपास १ महिन्यापूर्वी लाडू साहित्य जमा करण्याचे आवाहन केले जाते. शहरातील ३० केंद्रांवर साडे सात टन लाडू साहित्य सामुग्री जमा झाली. यामध्ये हरभरा डाळ, साखर, शुद्ध तूप आणि सुका मेव्याचा समावेश होता. जमा झालेले साहित्य ट्रकमधून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुदक्षिणा रुपात शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान मंदिरात भतांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आला.
या उपक्रमात प्रशांत महल्ले, वैशाली महल्ले, श्रीकांत प्रधान, राजहंस राऊत, प्रशांत उमक, नितीन रणनवरे, अनिल चन्नावार, सौरभ आकरे, अनंत बोबडे, श्रीकांत गाडवे, स्मिता वानखेडे, आदींसह शेकडोंनी सहकार्य केले.