माजी आ. डॉ. देवराव होळींची आश्रमशाळेला भेट

जपतलाईतील सर्पदंश प्रकारण

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
गडचिरोली
snakebite-incident धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल घेत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी पाहणी केली.
 

snakebite 
snakebite-incident यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली तसेच मृत विद्यार्थिनींच्या पालकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आरुषी सिंग व प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्याशी चर्चा करताना आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व परिसरातील सुरक्षितता या सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी डॉ. होळी यांनी केली. त्यानंतर त्यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मृत विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. जपतलाईसारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. होळी यांनी केली.