तो लपून फोटो काढायचा आणि मग कांड करायचा?

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
मुंबई
marine drive shocking incident मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या युवती आणि पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचे लपून फोटो काढणे तसेच सोशल मीडियाशी संबंधित खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली असून, हा आरोपी एखाद्या मोठ्या संशयित नेटवर्कशी जोडलेला आहे का, याचा तपास आता सुरू आहे.
 

marine drive shocking incident man arrested for secretly photographing women and accessing social media information 
मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या युवतींशी आरोपी संवाद साधत असे. त्यांना सोशल मीडिया प्रोफाइल दाखवण्यास सांगणे अथवा त्यांच्याकडून फोटो आणि वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न तो करत असल्याचे समोर आले आहे. नागरिक मोबाईलचा वापर करत असताना आरोपी त्यांच्या नकळत मोबाईल किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनचे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचा संशय आहे.
या संशयास्पद प्रकाराची कुणकुण एका युवतीला लागली. त्यानंतर तिने स्वतःच्या मोबाईलमध्ये आरोपीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला अटक केली.
आरोपीने नेमकी कोणत्या उद्देशाने युवती आणि पर्यटकांचे फोटो, व्हिडीओ तसेच सोशल मीडिया संबंधित माहिती गोळा केली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तो एखाद्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या माहितीचा पुढे कोणत्या कारणासाठी वापर केला जाणार होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईल डिव्हाईसची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमध्ये नेमकी कोणती माहिती किंवा सामग्री आढळते, तसेच त्याचे कोणाकोणाशी संपर्क होते, याचीही सखोल चौकशी केली जात आहे. या तपासातून आरोपीच्या कारवायांमागील नेमका उद्देश आणि त्याच्या संभाव्य नेटवर्कबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेच्या marine drive shocking incident पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाचे सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट सूरज अनिल पांडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील वैयक्तिक माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेल्यास तिचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर सोशल मीडिया वापरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.