बिनादप्तराच्या शिशुवाटिकेची पालकांना अनुभूती

पालक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Saraswati Shishu Mandir केशवनगर सांस्कृतिक सभेद्वारा संचालित व विद्याभारतीशी संलग्न सरस्वती शिशु मंदिर, नंदनवन येथे शिशुवाटिका विभागाच्या पालक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘बिनादप्तराची शिशुवाटिका’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे कृती व प्रात्यक्षिकांद्वारे सादरीकरण करण्यात आले.
 

ghar  
 
 
शिशुपरिषदेच्या सदस्या सुमेधाताई खोत यांनी भाषा, गणन, शारीरिक विकास तसेच विज्ञान प्रयोगांद्वारे बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याबाबत मार्गदर्शन केले. खेळ, कृती व अनुभवातून शिक्षण अधिक आनंददायी आणि परिणामकारक कसे करता येते, हे पालकांना प्रत्यक्ष अनुभवता आले.संस्थेचे अध्यक्ष धाराशिवकर सर व सचिव तुंगार सर यांनीही पालकांशी संवाद साधून शिशुवाटिकेच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेत शंकांचे निरसन करून घेतले. शाळा व पालकांमधील सुसंवाद वाढविणारी ही कार्यशाळा पालकांच्या विशेष पसंतीस उतरली.
सौजन्य:अश्विनी बोरकर,संपर्क मित्र