सर्पदंशग्रस्त दीपिकाचे पुढील उपचारासाठी नागपूरला एअरलिफ्ट

जिल्हा प्रशासनाची तत्परता हेलिकॉप्टरने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |

Snakebite victim Deepika airlifted to Nagpur
 
 
गडचिरोली,
Snakebite victim Deepika airlifted to Nagpur धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी (वय 11 वर्षे) हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले आहे.दीपिकावर उपचार सुरू असताना तिच्या प्रकृतीचा विचार करून अधिक उपचारासाठी तिला नागपूर येथे संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने तातडीने आवश्यक समन्वय साधत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि तिला एअरलिफ्ट करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी पोहोचविले. दीपिकाला आवश्यक असलेले पुढील वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील संबंधित वैद्यकीय यंत्रणेशीही समन्वय साधला आहे. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.