मुंबई
pratap sarnaik मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात टाटा समूहाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी मराठी बोलता येत नसल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली. कार्यक्रमात भाषणासाठी उभे राहिल्यानंतर कौर यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच माफी मागून केली. “सर्वात आधी मी माफी मागतो, कारण मी मराठी बोलू शकत नाही,” असे त्यांनी यावेळी म्हटले.
राजेश कौर यांच्या या वक्तव्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. कौर साहेब मुंबईत व्यवसाय करण्यासाठी आले असून ते व्यवसाय प्रमुख आहेत. मात्र, त्यांना मराठी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आपण कौर यांना 15 ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या मराठीच्या वर्गांची माहिती दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी शिकण्याची इच्छा असल्यास त्यांनी या वर्गांमध्ये सहभागी होऊन मराठी शिकावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“कौर साहेबांनी सांगितलं की, मी मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलो आहे, बिझनेस हेड आहे. मला मराठी येत नाही. परंतु मी त्यांना सांगितलं, 15 तारखेपर्यंत मराठीचे वर्ग सुरू आहेत. त्यांना जर मराठी शिकण्याची इच्छा असेल तर ते मराठी शिकू शकतात,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
आपली भूमिका मांडली
यावेळी सरनाईक यांनी या प्रकरणातील आपली pratap sarnaik भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हा विषय थेट त्यांच्या विभागाच्या कायदेशीर कक्षेत येत नाही, कारण मराठी विभाग त्यांच्याकडे नाही. मात्र, मराठी भाषेवर प्रेम करणारा व्यक्ती आणि एका साहित्यिकाचा मुलगा म्हणून कौर यांनी या विषयावर आपली भूमिका मांडल्यास त्यांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, येत्या 15 ऑगस्टपासून रिक्षाचालकांना मराठी बोलता येणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वीच रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली होती; मात्र त्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता यावी यासाठी विशेष मराठी प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले आहेत.15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांना मराठी बोलण्याच्या नियमातून कोणतीही सूट दिली जाणार नाही तसेच पुढील मुदतवाढही मिळणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा बोलणे बंधनकारक असणार असून, नियमांचे पालन न केल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.राजेश कौर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात मराठी येत नसल्याबद्दल व्यक्त केलेली खंत आणि त्यावर प्रताप सरनाईक यांनी दिलेला मराठी शिकण्याचा सल्ला यामुळे या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.