आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी नाशिक व नागपूर येथील आदिवासी विकास विभागाची पथके आज घटनास्थळी दोषींवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
students die of snakebite धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक व नागपूर येथील पथके आज घटनास्थळी दाखल होणार आहेत.
 
 
students die of snakebite
 
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करून निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान, उपचाराधीन तीन विद्यार्थिनींना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी व्हेनम) देण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. विद्यार्थिनींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.