१.५७ लाख शेतकर्‍यांनी घेतले १ कोटीचे विमा कवच

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
वर्धा
farmer insurance शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पीक विमा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आधार देणारा ठरतो. शेतीपिकांवर निर्माण होणार्‍या नैसर्गिक संकटांचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकांना विमा कवच दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग आणि ज्वारी या पिकांचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपयांची रक्कम भरली आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा आधार मिळणार आहे.

farmer 
 
वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५५४.८५ हेटर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यत केला आहे. तर प्रत्यक्षात ४ लाख १ हजार हेटरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड झाल्याचे वास्तव आहे. तर पिकांच्या पेरणीचा अंतिम अहवाल जाहीर झाल्यावर नेमया किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड झाली, हे स्पष्ट होणार आहे. हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पावसातील खंड, वादळी वारे तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींचा शेतीपिकांना मोठा फटका बसण्याची शयता असते. अशा परिस्थितीत पीक विमा शेतकर्‍यांसाठी आर्थिक सुरक्षाकवच ठरतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे.
 
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांची लागवड करतात. या पिकांच्या उत्पादनावर हवामानाचा परिणाम होत असल्याने पीक विम्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा योजनेच्या निकषांनुसार नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असल्याने शेतकर्‍यांना संभाव्य आर्थिक जोखमीपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. खरीप पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकर्‍यांनी पीक विमा काढल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
पीक विमा काढलेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी
आर्वी : १३ हजार ९२४
आष्टी : ७ हजार ८६७
देवळी : २२ हजार ३७६
हिंगणघाट : ३४ हजार १९७
कारंजा : १२ हजार ४९१
समुद्रपूर : ३० हजार ०३१
सेलू : १८ हजार ४२०
वर्धा : १७ हजार ९३६