भंडारा,
government hospitals लाेकांचे आराेग्य सुधारण्यासाठी असलेल्या एकेकाळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे, मात्र आजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचेच आराेग्य ढासळले आहे. तब्बल ३६० लाेखंडी खांबांचा आधार घेउन रुग्णालयाची ही इमारत उभी असल्याचे विदारक चित्र आहे. रुग्ण उपचार घेतलेल्या असलेल्या वाॅर्डात रुग्णांना डाेळयापूढे दिसणारे हे लाेखंडी टेकू रुग्णांना बरे करण्याऐवजी आणखी मानसिक दृष्टया खचविण्याचे काम करीत आहे. रुग्णालयाची ही अवस्था नक्कीच शासन, प्रशासनासाठी चिंतेचाच विषय आहे.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्थ गेले आहे. जिल्हा शल्यचिकित्सका ऐवजी आता या व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहेत.
दर्जा वाढला, व्याप वाढला मात्र रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे चित्र आहे. ज्या वाॅर्डात आज रुग्ण उपचार घेत आहेत, अशा बहुतांश ठिकाणी इमारतीचे स्लॅप तुटल्याचे चित्र आहे. पाेपडे पडत आहेत. कदाचित धाेका हाेण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी या इमारतीला आधार देण्यासाठी लाेखंडी टेकू लावले आहेत. एक दाेन नव्हे तर ३६० लाेखंडी टेकूवर ही इमारत उभी असल्याचे वास्तव खा. डाॅ. प्रशांत पडाेळे यांच्या भेटी दरम्यान उघड झाले.
आज जेथे रुग्ण उपचार घेत आहेत. तेथील ही अवस्था चिंता वाढविणारी आहे. स्लॅपला लावलेले टेकू उपचार घेत असलेल्या रुग्णांना डाेळयादेखल पहावे लागत असल्याने त्यांची त्या इमारतीत उपचार घेण्याची मानसिकता किती सकारात्मक असेल, हे आपण समजू शकताे. याच ठिकाणी काम करणारे डाॅक्टर, नर्स असे सर्व कर्मचारी यांचा वावर असताे. काेणतीही माेठी दूर्घटना झाल्यास माेठा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी ३६० लाेखंडी टेकूवर उभे असलेले हे रुग्णालय जीवावर उठते की काय? असा प्रश्न नक्कीच उपस्थित हाेईल.government hospitals वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्या मतानूसार इमारतीची अवस्था चांगली आहे. ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी हे खांब लावले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण सामान्य नागरिकांना मात्र अशा खांबाच्या साक्षीने उपचार घेणे म्हणजे जीव धाेक्यात टाकणे असेच वाटत आहे.
ताबडताेब व्यवस्था करा: खा. पडाेळे
खांबाच्या आधारे इमारत उभी आहे. काेणतीही दुर्घटना झाल्यास अनेकांचे जीव जाउ शकतात. इमारत खराब झाली असल्याने नवीन इमारत बांधली जावी, ताेपर्यंत कुठली तरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. लाेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करु नये, असे स्पष्ट मत भंडाऱ्याचे खा. प्रशांत पडाेळे यांनी व्यक्त केले. खासदारांनी पूर्ण रुग्णालयाची पहाणी करुन प्रचंड नाराजी व्यक्त केली.