कारची दोन विद्यार्थ्यांना धडक

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
students accident वर्धा रोडवरील साई मंदिरासमोर कारचालक कार रिव्हर्स घेत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर कारचालक पसार झाला. दोन्ही जखमींवर मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामला जुनी वस्ती येथील तन्मय राऊत (वय १८) हा बी.कॉम. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचा शाळकरी मित्र लोभस काळे (वय १९, रा. पांडे लेआउट) हा इव्हेंटमध्ये व्हिडिओ शूटिंगचे काम करतो.
 
 
students accident
 
 
सोमवारी पहाटे ३ वाजता लोभसने तन्मयला फोन करून गोरेवाडा आणि बुटीबोरी येथे इव्हेंटचे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले. त्यानंतर लोभस ॲक्टिव्हावरून पहाटे पावणेचारच्या सुमारास तन्मयच्या घरी पोहोचला. दोघेही आधी गोरेवाडा येथे गेले. तेथील काम आटोपल्यानंतर पहाटे पावणेपाचच्या सुमारास ते बुटीबोरीच्या दिशेने निघाले. पहाटे ५.१० वाजताच्या सुमारास वर्धा रोडवरील साई मंदिरासमोर पोहोचले.students accident त्यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या निळ्या रंगाच्या (एमएच-४३-बीएफ-४१११) क्रमांकाच्या पोलो कारचालकाने अचानक वेगात कार रिव्हर्स घेतल्याने मागून येणाऱ्या ॲक्टिव्हाला जोरदार धडक बसली. त्यामुळे तन्मय आणि लोभस हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कारचालकाने त्यांना मदत न करता तेथून कारसह पळ काढला. तन्मय बेशुद्ध झाला. त्याला आणि लोभसला नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.