कोलंबिया
colombia earthquake पश्चिम कोलंबियाला सोमवारी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा तडाखा बसला. या भीषण भूकंपात आतापर्यंत १११ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांसह बचाव पथकांकडून उद्ध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या कैलीमध्ये भूकंपानंतर मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. बचाव पथकांसोबत स्थानिक नागरिकांनीही उद्ध्वस्त इमारतींचे ढिगारे हटविण्याचे काम हाती घेतले असून, त्यातून मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. शहरात सर्वत्र विनाशाचे चित्र दिसत आहे. हादरलेल्या नागरिकांनी अश्रू अनावर होत आपली व्यथा मांडताना, “आमची इमारत जवळपास भग्नावस्थेत आली आहे आणि आमच्या शेजारील इमारत तर पूर्णपणे कोसळली आहे,” असे सांगितले.
भूकंपानंतरचे हे हृदयद्रावक दृश्य शेजारील व्हेनेझुएलामधील सुरू असलेल्या शोधमोहीमेची आठवण करून देणारे आहे. व्हेनेझुएलामध्ये यापूर्वी दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता.
अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, कैलीव्यतिरिक्त पश्चिम कोलंबियातील परेरा, क्विबडो आणि मनिज़ालेस यांसारखी अनेक शहरेही भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत. या भूकंपाचे धक्के शेजारील इक्वाडोर आणि पनामा या देशांमध्येही जाणवले.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष colombia earthquake अबेलार्डो डे ला एस्प्रिएला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान ८७ जण जखमी झाले असून सुमारे १,६०० इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यापैकी किमान ६१ इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. भूकंपानंतर मदतकार्य आणि पुनर्बांधणीसाठी निधी वेगाने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.आम्ही लोकांना एकटे सोडणार नाही. ते आमच्या हृदयात आहेत आणि आम्ही पूर्ण निर्धाराने त्यांची काळजी घेऊ,” अशी ग्वाही कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.कोलंबियाच्या जिऑलॉजिकल सर्व्हिसने सोमवारी झालेला हा भूकंप “२१व्या शतकातील” देशातील सर्वाधिक तीव्र भूकंप असल्याचे म्हटले आहे. मुख्य भूकंपानंतरही अनेक आफ्टरशॉक्स अर्थात भूकंपाचे धक्के जाणवले.
केंद्र असलेला कोलंबियाचा प्रशांत प्रदेश ‘रिंग ऑफ फायर’च्या काठावर वसलेला आहे. प्रशांत महासागराभोवती पसरलेल्या भूकंपीय दरारांच्या या पट्ट्यात जगातील बहुतांश भूकंप होतात. त्यामुळे या भागाला भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते.