संस्कारांची शाळा, खेळांची दुनिया

बालगुरुकुलमध्ये प्रवेश सुरू

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Deendayal Research Institute दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे बालगुरुकुलचे नवीन सत्र १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. २.५ ते ४ वर्षे वयोगटातील बालक-बालिकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवेश घेता येणार आहे.
 

bal2 
 
बालगुरुकुलमध्ये मुलांना खेळता-खेळता गाणी, गोष्टी, श्लोक आदी शिकविले जातात. तसेच ५ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळ, धावणे, चित्रकला, हस्तकला, मातीकला यासह तबला, कॅसिओ, कथ्थक, भरतनाट्यम व कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय संस्कृतीवर आधारित आचार-विचार व संस्कार मुलांमध्ये रुजवून त्यांना संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला जातो. इच्छुक पालकांनी बालजगत येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
सौजन्य:सायली जतकर,संपर्क मित्र