वयोवृद्ध दाम्पत्याची डिजिटल अरेस्टमधून सुटका

सायबर पोलिसांनी घेतली तात्काळ दखल

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
अमरावती
-digital-arrest येथील वयोवृद्ध दाम्पत्याची डिजिटल अरेस्टमधून सुटका करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिस स्टेशनला माहिती मिळाली की, शिवछाया कॉलनीतील ८२ वर्षाचे जेष्ठ नागरिक विजय डाखोडे यांना कोणीतरी पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच तुमच्या नावाने कॅनेरा बॅक, नाशिक येथे बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्याचा उपयोग मनि लॉड्रींग, सायबर फसवणूक व इतर देशविरोधी बेकायदेशीर कृत्ये करण्याकरीता करण्यात आला.

digital arrest 
 
 
त्याचा तपास करण्याकरीता तुम्हाला अटक करावी लागेल असे सांगितले. १० आॅगस्टला सांयकाळी ६ वाजता अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला होता. याबाबत कुठेही वाच्यता करु नये अन्यथा तुम्हाला अटक करावी लागेल असेही फोन करणाऱ्यांनी म्हटले होते. सदर प्रकारामुळे घाबरलेल्या विजय डाखोडे यांनी सहकार्य करण्याची समहती दर्शवीली. फाेन करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे डाखोडे यांनी सर्व बँक खाती, मौल्यवान दागिने, बँक एफडी व इतर गुंतवणुकीची संपुर्ण माहिती तपशिलवारपणे त्यांनी दिली. सदर गुन्ह्यातून सुटका करावयाची असल्यास आम्ही सांगीतल्याप्रमाणे वागावे लागेल व तपास पूर्ण होईपर्यत सर्व जमा रक्कम विशिष्ट बँक खात्यामध्ये पाठवावी लागेल, असा दम दिला होता. डाखोडे यांना शंका आल्याने त्यांच्या पत्नी जयश्री यांनी त्यांचे जावई मंगेश देशमुख यांना कॉल करुन माहिती देण्यास सांगितले. मंगेश यांनी तात्काळ सायबर पोलिस स्टेशनचे कर्मचारी निखील माहुरे यांच्याशी संपर्क करुन सदर प्रकाराची माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तात्काळ पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांना माहिती दिली. त्यांनी राजापेठचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना माहिती देऊन विजय डाखोडे यांच्याकडे पाठविले. डिजीटल अरेस्ट या गुन्हे प्रकारातून सुटका करुन संभाव्य आर्थीक नुकसानापासून वाचविले व जेष्ठ दाम्पत्याचे सायबर पोलिस स्टेशन येथे आणून समुपदेशन केले.