अनिल कांबळे
नागपूर,
attacked with knife प्रियकराची वाट बघत रस्त्यावर उभी असलेल्या महिलेला बघून तिच्या ऑटोचाकक असलेल्या मित्र थांबला. तिच्याशी गप्पा करीत असताना महिलेच्या प्रियकराने बघितले. संतापलेल्या प्रियकराने महिलेच्या मित्रावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना अंबाझरी तलाव परिसरात घडली. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १०.३० वाजताच्या सुमारास अंबाझरी तलावाच्या पायऱ्यांजवळ घडली. संजय (२२) हे ऑटोचालक असून ते ऑटोने प्रवासी सोडल्यानंतर अंबाझरी मार्गाने सीताबर्डीकडे जात होते. त्यावेळी तलावाजवळ त्यांना मैत्रिण दिसली.
त्यामुळे त्यांनी ऑटो थांबवून तिच्याशी संवाद साधला. दरम्यान, महिलेचा प्रियकर शुभम (२०) तेथे आला. त्याने संजय याला प्रेयसीसोबत बोलण्याचे कारण विचारले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपी शुभमने संजयला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने खिशातून छोटा चाकू काढून संजयवर हल्ला केला. या हल्ल्यात संजयच्या डाव्या खांद्याला चाकूची दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.attacked with knife संजय यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील दुखापत करणे आणि जाणीवपूर्वक अपमान करण्यासंदर्भातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलेशी बोलण्यावरून नेमका वाद कशामुळे निर्माण झाला आणि हल्ल्यामागील इतर कारणे काय होती, याचा तपास अंबाझरी पोलिस करीत आहेत.