नागपूर,
Lions Club of Nagpur लायन्स क्लब ऑफ नागपूर मेट्रोपॉलिटनतर्फे शांती विद्या भवन, एमआयडीसी, हिंगणा-दिगडोह येथे ५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. सन २०१० पासून क्लबतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदा या सेवाकार्याला १६ वर्षे पूर्ण झाली.
प्रमुख पाहुणे विभाग अध्यक्ष एमजेएफ विजय पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी दिलीप पानकुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष दिलीप कुकडे, सचिव मानव महोलकर, उपक्रम प्रमुख पियू लाहोरी यांच्यासह पीडीजी चंद्रकांत सोनटक्के, डॉ. प्रदन्या गुल्हाणे, अनिल गुल्हाणे, सविता राऊत, संजय राऊत, गोपाल हजारे आदी उपस्थित होते.शाळेच्या प्राचार्या रंगाचारी आणि तिवसे सर यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाचे हास्य उमटले. शिक्षणाच्या प्रवाहात गरजू विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, या उद्देशाने सुरू असलेली ही सेवाज्योत पुढेही अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सौजन्य:पियू लाहोरीसंपर्क मित्र