बंगळुरू,
narcotics seized 39 arrested पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ जणांना ज्यामध्ये आठ विदेशी नागरिकांचा समावेश असलेल्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५.८० कोटी रुपये किमतीचे मादकपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई ‘मिशन राईज’ आणि बेंगळुरू शहर पोलिसांच्या मादकपदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ‘बेडा ब्रो’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून करण्यात आली. ‘मिशन राईज’ अंतर्गत बेंगळुरू तसेच दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि केरळ यांसारख्या इतर राज्यांमधील विविध ठिकाणांहून ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मादकपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
जप्त केलेल्या पदार्थांमध्ये एमडीएमए, हायड्रो गांजा, कोकेन आणि गांजा यांचा समावेश आहे. या मोहिमेत ३९ जणांना अटक करण्यात आली. यात आठ विदेशी नागरिक, इतर राज्यांतील २१ जण आणि १० स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे, असे बेंगळुरू शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी सांगितले. सीसीबीसह शहर पोलिसांच्या १६ पथकांनी मिळून ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विदेश, इतर राज्ये आणि कर्नाटकातील अज्ञात पुरवठादारांकडून प्रतिबंधित मादकपदार्थ कमी किमतीत खरेदी करत असत आणि जलद नफा मिळवण्यासाठी ते सामान्य जनता व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चढ्या दराने विकत असत, असे चौकशीदरम्यान या ३९ आरोपींनी सांगितले.