मला आता जगायचे नाही’; आईला सांगून ४० वर्षीय व्यक्तीने जीवन संपविले

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
succide committed ‘मला आता जगायचे नाही’, असे आईला सांगितल्यानंतर सुरेंद्रगड परिसरातील एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी जीवन संपविल्याची घटना घडली. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृताचे नाव सतीश रमेश यादव (४०, रा. सुरेंद्रगड) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सतीश यांना दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी सतीश हे दारूचे सेवन करून घरी आले होते.
 
 
succide committed
 
 
रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी आई उषा रमेश यादव (६३) यांना ‘मला आता जगायचे नाही’, असे सांगितले. मुलाच्या बोलण्याने आई घाबरली. तिने सतीश यांना समजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सतीश आपल्या खोलीत गेले. काही वेळाने कुटुंबीयांनी त्यांची चौकशी करण्यासाठी खोलीत पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत तपास सुरू केला.succide committed आई उषा यादव यांच्या जबाबावरुन गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सतीश यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.