समूहगान स्पर्धेत आर. एस. मुंडले विद्यालय प्रथम

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर, 
R. S. Mundle School भारत विकास परिषद दक्षिण-पश्चिम शाखेतर्फे ८ ऑगस्ट रोजी मुंडले सभागृहात राष्ट्रीय समूहगान प्रतियोगिता उत्साहात पार पडली. स्पर्धेत नागपुरातील १२ शाळांनी सहभाग घेतला. ‘राष्ट्रीय चेतना के स्वर’ या पुस्तकातील हिंदी व संस्कृत गीतांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
 
 
smuh
 
 
 
स्पर्धेचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून अविनाश शिंदे उपस्थित होते. हिंदी व संस्कृत दोन्ही गीतांच्या एकत्रित गुणांमध्ये आर. एस. मुंडले विद्यालयाने प्रथम, नारायण विद्यालयाने द्वितीय तर ब्लाइंड स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. एस. ओ. एस. अत्रे लेआउटला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.संस्कृत गीतासाठी सोमलवार निकालस प्रथम व सरस्वती विद्यालय द्वितीय, तर हिंदी गीतासाठी सांदीपनी स्कूल प्रथम व दीनानाथ हायस्कूल द्वितीय ठरले. परीक्षक म्हणून नीरजा वाघ, अनुराधा सैनिक व निखिल मडावी यांनी काम पाहिले. शाखेच्या अध्यक्ष शुभांगी काकडे, सचिव उषाताई घुई व कोषाध्यक्ष मिलन काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सीमा मुनशी, दिलीप गुळकरी, आसावरी वरकड, राहुल बजाज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य:सीमा मुनशी,संपर्क मित्र