शिरपूर येथे संत सावतामाळी संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
मालेगाव,
sant savata mali तालुक्यातील शिरपूर येथील श्री संत सावता माळी संस्थानवर संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी रामाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून भव्य पालखी सोहळा शोभायात्रा काढण्यात आली. संत सावता माळी यांच्या जय घोषाने शिरपूर नगरी दुमदुमन गेली होती. पालखी सोहळ्यानंतर कालयाचे कीर्तन झाले त्यानंतर व आयोजित महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
 

sant savata mali 
 
 
शिरपूर येथील श्री संत शिरोमणी सावता माळी संस्थानच्या वतीने संत सावता माळी यांच्या ७३२- व्या संजीवन समाधी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. सावता महाराज संजीवन योहळ्यानिमित्त संस्थांनमध्ये सतत सात दिवस श्रीमद् भागवत कथा वाचनासह भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले. ११ ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणीसावता माळी यांचे समधाधी सेहळ्यानिमित्त भाविकांनी सकाळपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सावता महाराजांच्या मूर्तीला मोरे यांचे सह सपत्नीक अभिषेक करून पूजा केली. सकाळी नऊ वाजता संस्थानवरून श्री संत सावता माळी यांच्या पालखीची शोभायात्रा टाळ मृदंग व लेझीम पथकाच्या गजरामध्ये काढण्यात आली. या पालखी सोहळया मध्ये हजारो समाज बांधव भगिनी भजनी दिंडी मंडळ बँड पथक घोडेस्वार सहभागी झाले होते. ठिकठिकाणी श्री संत सावतामाळी पालखीचे महिलांनी रांगोळी काढून स्वागत करून पूजन केले.
शिरपूर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी सावतामाळी महाराजांच्या पालखीचे पूजन केले दर्शन घेतले. जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या वतीने पालखीचे स्वागत करून पूजन करुन दर्शन घेतले. पालखी दरम्यान भक्तांनी फुगडी खेळून मनमुराद आनंद घेतला.sant savata mali माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. श्याम गाभणे यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. श्री संत शिरोमणी सावता माळी नवयुवक मंडळाच्या वतीने पालखीतील भक्तांना खिचडी वाटप करण्यात आली. जय भारत नवयुक मंडळाच्या वतीने दुध वाटप, औंढा नागनाथ नवयुवक मंडळाच्या वतीने चहा पाणी वाटप करण्यात आले. राजू देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने चहा पाणी ठेवण्यात आला होता. पालखी गावामधून फिरवून आल्यानंतर विश्वनाथ जाधव महाराज वसारीकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. जानगीर महाराज संस्थांनचे मठाधिपदी सोहमगीर बाबा यांचे हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जानगीर महाराज संस्थांनवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.