२६६ कोटींच्या रखडलेल्या कामासाठी सरुळ शिवारात ठिय्या आंदोलन

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
मोझरी (शेकापूर),
sit in protest in the fields दहेगाव ते कात्री राज्य महामार्गाचे २६६ कोटींचे बांधकाम मार्गी लावण्यासाठी संतप्त नागरिकांनी यशोदा नदीजवळ दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जनक्षोभ बघून रखडलेले काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
 
 
sit in protest in the fields
 
एक वर्षापासून दहेगाव ते कात्रीपर्यंत रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखलच चिखल पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून अनेकांचे अपघात झाले. रस्त्याची दुरवस्था एवढी गंभीर आहे की, शाळेच्या बसेस बंद झाल्या आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, सोमवारी सरूळ येथील यशोदा नदीजवळ बसून संतप्त युवक आणि विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. नागरिकांनी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मुत्येलवार, प्रोजेट मॅनेजर सोमकुमार, वॉलिटी कंट्रोल अधिकारी माथूर आदी आंदोलनस्थळी दाखल झाले. चर्चेअंती या रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
 
 
याप्रसंगी प्रवीण कात्रे, अ‍ॅड. मंगेश घुंगरूड, संदीप दिघीकर, समीर सारजे, लोमहर्ष बाळबुधे, समीर इंगोले, गजानन वड्याळकर, सुभाष इंग़ोले, माधव शेंडे, रुपराव खैरकार, दिलीप बाळबुधे, गौरव खोपाळ, प्रवीण खाडे, मंगेश वानखेडे, वृषभ गोडे, हरीश भालेराव, हनुमंत पचारे, सुधीर भगत, सुमित झोरे, गजानन ताकसांडे, किरण सरोदे, आदींसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.