मानोरा
hazardous-power-lines तालुयातील तळप बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या आवारातून आणि प्रवेशद्वारावरून गेलेल्या उघड्या विद्युत वाहिन्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या तारा तातडीने हटवाव्यात यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता, वाशीम यांना ८ दिवसांची मुदत देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या स्मरणपत्रानुसार, या संदर्भात आ. सर्ई डहाके यांच्यापासून ते शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना यापूर्वीच निवेदने देण्यात आली आहेत. १३ जून २०२६ रोजी झालेल्या सभेत तारा काढण्याबाबत ठरावही घेण्यात आला होता. मात्र, वारंवार निवेदन देऊनही महावितरणकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने समितीने पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. येत्या ८ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनसमितीच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या आवारातून जाणार्या उघड्या तारामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने त्या काढणे आवश्यक आहे. येत्या ८ दिवसांच्या आत शाळेच्या परिसरातून गेलेल्या विद्युत तारा काढण्यात याव्यात. अन्यथा आम्ही आमच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.