स्वर-नाद’चा संगीतोत्सव उत्साहात

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Swarnad Music Academy स्वर-नाद संगीत अकॅडमी, नागपूरचा गुरुपौर्णिमा संगीतोत्सव गुरुवर्य . दीपक पट्टलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. दोन सत्रांत झालेल्या या कार्यक्रमात ४३ गायक-गायिकांनी विविध सुरेल गीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या सुमधुर गायनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
 

bhush
 
 
पहिल्या सत्राची सुरुवात ‘सत्यम शिवम सुंदरम’, तर दुसऱ्या सत्राची सुरुवात ‘आदमी मुसाफिर है’ या गीताने झाली. . दीपक पट्टलवार यांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संगीत संयोजन पट्टलवार यांनी केले, तर अमोल ऊरकुडे, कुणाल दहेकर व श्रीकांत कुळकर्णी यांनी वाद्यसाथ दिली.कार्यक्रमाचे संचालन मयुरी राठोड यांनी केले. अरुणा जगताप, अंजली बोरावार, श्रीकांत सप्रे व उज्वला अंधारे यांनी निवेदन केले. नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल उज्वला अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. मिनल चांगदे यांनी आभार मानले.
सौजन्य: संजय भुसारी,संपर्क मित्र