ट्रम्प यांचा तुर्कस्तानमध्ये फूड ट्रकमधून लपून प्रवास

इराणच्या दहशतीमुळे घाबरले ‘शक्तिशाली’ राष्ट्राध्यक्ष

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
food truck in turkey अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दर दोन दिवसांनी इराणला तुम्हाला उद्ध्वस्त करू अशी धमकी देत असतात. तसेच इराणची लष्करी ताकद संपुष्टात आल्याचा दावा देखील ते वारंवार करत असतात. मात्र, नुकतेच इराणकडून असलेला धोका डोनाल्ड ट्रम्प यांनी किती गांभीर्याने घेतला होता हे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानमधून बाहेर पडण्यासाठी फूड ट्रकचा वापर केला होता. तसेच त्यांनी एअर फोर्स वन ऐवजी लष्कराच्या जेटने प्रवास केला होता, असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे.
 
 
trump
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो समीटमध्ये जाण्यासाठी कतारने भेट दिलेल्या नव्या एअर फोर्स वनच्या विमानाने प्रवास केला होता. मात्र, त्यांनी कतारमधून बाहेर पडताना जुन्या एअर फोर्स वनचा वापर केला. त्यामुळे सुरक्षेबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते. नाटोच्या समीटसाठीची ट्रीप ही डोनाल्ड ट्रम्प यांची कतारने गिफ्ट केलेल्या विमानातून केली जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप होती. मात्र, इराणसोबतच्या तणावपूर्ण वातावरणात इराणच्या शेजारील देशात जाताना मोठा धोका होता. त्यामुळ् डोनाल्ड ट्रम्प यांनी जुने एअर फोर्स वनचे विमान वापरले. त्यांनी गुप्तरीत्या एअरपोर्ट कॅटरिंग ट्रकचा वापर करून दुसऱ्या छोट्या विमानात शिरले. त्यांनी एअर फोर्स सी-३२ ए या विमानातून प्रवास केला. याबाबत यूएस ऑफिशिअल्स आणि इतर लोकांना राष्ट्राध्यक्षांच्या या प्रवासाबाबत माहिती होती. सी-३२ ए हे विमान तुर्कस्तानमधून ब्रिटनमध्ये रात्री १०.२० मिनिटांनी लॅण्ड झालं. त्याचबरोबर जुने एअर फोर्स वनदेखील लॅण्ड झाले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर त्यांनी जुन्या बेबी ब्लू एअर फोर्स वनचा वापर केला होता असे सांगितले होते.