महिलेच्या हँडबॅगमधून 15 हजार लंपास

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
वणी,
15000-stolen-from-womans-handbag ऑटोतून प्रवास करणाèया एका महिलेच्या हँडबॅगमधून 15 हजार रुपये लंपास केल्याची घटना वणी येथे घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू आहे. नांदेपेरा येथील महिले बँकेतून 15 हजार रुपये काढले. बँकेचे काम आटोपल्यानंतर ती गावी जाण्यास वणी बसस्थानकावर आली. तेथून ऑटोरिक्षाने नांदेपेराकडे जात असताना साईबाबा मंदिर चौकाजवळ तीन अनोळखी महिला ऑटोरिक्षात बसल्या. साईबाबा मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली दरम्यानच्या प्रवासात संबंधित महिलेच्या हँडबॅगमधून 15 हजार रुपये लंपास करण्यात आल्याचा संशय आहे. नांदेपेरा चौफुलीवर तीनही अनोळखी महिला ऑटोरिक्षातून उतरल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ दुसरी ऑटोरिक्षा पकडून वणी शहराच्या दिशेने प्रयाण केल्याचे सांगण्यात येते. ऑटोतील काही प्रवाशांना संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यांनी आपापल्या बॅगा तपासल्या. त्यावेळी संबंधित महिलेच्या हँडबॅगमध्ये ठेवलेली 15 हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.
 
 
15000-stolen-from-womans-handbag