आर्णी,
44-people-donate-blood जागतिक आदिवासी दिनानिमित्त आर्णी तालुक्यातील कोपरा येथे क्रांतीसूर्य बिरसा विचार मंचाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन अजय भायमारे, किशोर देवकर, शशिकांत झळके, गणेश ढोके, शिवम उगले, अमोल बेले, लक्ष्मण थरकडे, काशीराम भायमारे, राजेश्वर शिंदे, लिंबाजी थरकडे व क्रांतिसूर्य बिरसा विचार मंच, कोपरा यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या उपक्रमाला सरपंच अनुसया संजय काळे, उपसरपंच सुशीला किशोर देवकर तसेच प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद मोहाडे यांचे विशेष सहकार्य लाभले होते. लिंगी, सायखेडा, चिकणी (क), पिंपरी, डोळंबा, पिंपळनेर तसेच आर्णी येथील समाजबांधव यावेळी उपस्थित होते.