जिल्हा बँक निवडणूकीत आ. मनोज कायंदेचे पॅनल कोणते परिवर्तन घडविणार...

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
बुलढाणा
district-bank-election बुलढाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेत आता पर्यंतच्या इतिहासात १९६० ते ९० च्या दशकात सर्वाधिक अध्यक्ष पदाचा कार्यकाळ सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे परिवाराचा वरचष्मा राहिला आहे. २००० च्या दशकात सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, लोकप्रतिनिधी, शेतकरी याच्या वसूल न झालेल्या कर्जापायी हि बँक आर्थिक दृष्ट्या डबघाईस आली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताधारी संचालकांनी बँकेला आर्थिक मदत करण्याचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर राज्यात आलेल्या भाजप- सेना(शिंदे) राकॉ (अपा) महायुतीने या बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढले.
 
buldhana bank
 
सध्या जिल्हा बँकेची २१ संचालक पदासाठी निवडणूक सुरु असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष इच्छूक असल्याने तसेच यापूर्वी देखील या पदावर असलेले लोकप्रतिनिधीच संचालकपदावर विराजमान झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी कष्टकर्‍याची हक्काची जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेला चार दशके सुवर्णकाळचे जाळे सुध्दा बँकेच्या क्षेत्रात ग्रामीण भागात विणल्या गेलेत. दुसरीकडे या काळात जिल्हयातील साखर कारखाने, सुतगिरण्या, शेतीप्रक्रिया उद्योगात सुद्धा सोन्याचा धुर दिसत होता. परंतू दोन हजारच्या दशकात या उद्योगांना लागणारा उस, कापूस शिवाय कामगारांचे प्रश्न मागण्या राजकीय इच्छा शक्तीने खीळ बसली हिच स्थिती कर्ज बाजारी झालेल्या जिल्हा सहकारी बँकची झाली. बँक अडचणीत असतांना तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी कर्ज उपलब्ध करून दिल्याने बँक आता नफ्यात आल्याने राजकीय नेत्याचा भुवया उंचावल्या आहेत. बँकेचे सहकार पॅनलचे सर्वेसर्वा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने २१ संचालकापैकी १२ संचालक अविरोध झाले आहे. त्यात प्रामुख्याने स्वतः डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर, आ. संजय गायकवाड, उबाठा जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, आ. श्वेता महाले यांचे वडील अकुंशराव पडघान, प्रसन्नजीत पाटील, मयूर बाहेकर यासह इतरांचा समावेश आहे. तसेच ९ जागांसाठी २३ अर्ज कायम असल्याने २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
 
डॉ. राजेंद्र शिंगणे याच्या सहकार पॅनेल समोर आ. मनोज कायंदे यांनी दंड धोपटून पत्रकार परिषदेत या निवडणूकीत स्व. अजितदादा शेतकरी परिवर्तन पॅनल उभे ठाकणार असल्याची घोषणा वजा निर्णय जाहीर केल्याने तसेच विविध जागावर उमेदवाराचे नावे सुद्धा जाहीर केले आहे. सहकार क्षेत्रात राजकीय दृष्ट्या मतब्बर असलेल्या सहकार पॅनेलच्या अविरोध संचालकांना आव्हान देणारे परिवर्तन पॅनल कमकुवत दिसत असले तरी आ. मनोज कायंदेच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल पहिल्यांदाच कमी वयात सिंदखेडराजा चे आमदार होऊन डॉ. राजेंद्र शिंगणेचा पराभव करणार्‍या मनोजची सहकार क्रांती ऑगस्ट महिन्यात लोकप्रिय होते की पराभूत याकडे सहकार व राजकीयदृष्ट्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.