खाटू श्याम रेल्वे यात्रेला महिला भक्तांचा उदंड प्रतिसाद

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
बुलडाणा
khatu-shyam-rail-pilgrimage खाटू श्यामजींच्या दर्शनाची आणि श्रीमद् भागवत कथेची अनुभूती घेता यावी यासाठी सदभावना सेवा समितीच्या वतीने आयोजित खाटू श्याम रेल्वे यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे यात्रेतील तब्बल ६१ टक्के सहभागी महिला व ज्येष्ठ नागरिक आहेत.

chandak 
 
 
एकट्याने प्रवास करता येत नसल्याने धार्मिक यात्रा करण्याची इच्छा अपूर्ण राहणार्‍या भक्तांसाठी समितीने सुरक्षित रेल्वे प्रवासासह निवास, भोजन आणि धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था केली आहे. भक्तांनी समितीवर दाखविलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक भक्ताला आनंददायी आणि संस्मरणीय यात्रा अनुभवता यावी, यासाठी समिती प्रयत्नशील आहे असे सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट केले आहे.
 
भक्तांना सकस आहार मिळावा आणि संपूर्ण प्रवासात चोख व्यवस्था राहावी, यावर समिती विशेष लक्ष देत आहे.चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा, मधुकर गायकी, पुरणमल शर्मा, बबन परांजपे, लाला माधवाणी, मनमोहन शर्मा, रामनिवास यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक हे यात्रेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून असून कथा व यात्रा यशस्वी होण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करीत आहेत अशी माहिती समितीचे सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी दिली. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान सरला सुरेशचंद्र गट्टाणी आहेत.