गडचिरोली
snakebite-incident धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे आणि सचिव विश्वजीत कोवासे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत यापूर्वी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री चिलमलवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावरही विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जपतलाई आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास जमिनीवर झोपलेल्या पाच विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला होता. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही हलगर्जीपणा झाला का, तसेच आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Culpable Homicide Case Filed Against Institution President and Secretary Over Snakebite Incident
Former MP Marotrao Kovase and his son Vishwajeet Kovase named; action also taken against the headmaster and superintendent.
Gadchiroli
The case involving the deaths of three female students due to a venomous snakebite at the *Ashramshala* (residential school) in Japtalai, Dhanora taluka, has taken a serious turn. A case of culpable homicide has been registered against the president of the institution running the school—former MP Marotrao Kovase—and the secretary, Vishwajeet Kovase, on charges of being responsible for the students' deaths.