जेष्ठ नागरिक प्रवासी सवलतीत अडचणी

बोटांचे ठसे मशीनवर उमटत नसल्याच्या तक्रारी

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
बुलढाणा
travel-concessions राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिक ज्यांनी वयाची ७५ गाठली अशाना प्रवास सवलत मोफत आहे. बुलढाणा येथे जेष्ठ नागरिकांना या सवलतीची पास मिळण्यासाठी बोटाचे ठसे मशीनवर द्यावे लागतात. अनेक वयोवृद्धांचे ठसे मशीनवर उमटत नसल्याची तक्रार भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते जगदेवराव बाहेकर यांनी केली आहे.

travel 
 
यासंदर्भात बसस्थानक प्रमुख गडलिंग यांच्याशी संपर्क साधल्या असता ज्यांचे ठसे उमटत नाही त्यांनी तहसिल कार्यालयात स्वतःचे आधार कार्ड बोटाच्या ठसानुसार करून वयाचा पुरावा आधार कार्डवर द्यावा तसेच डोळ्यांची तपासणी रेटिना मशीनमार्फत केली जाते. तीसुद्धा आधार कार्डच्या मशीनवर होते. त्यानंतरच ही सवलत प्रवाशांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले असून यासंदर्भात वयोवृद्ध प्रवाशांनी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच प्रवाशाकडून वसूल करण्यात येणारा तिकाटावरील स्वच्छात अधिभार हा निर्णय वरिष्ठ स्तरावरून झाला आहे.
 
बसस्थानकावरील शौचालय साफसफाई ठेका पद्धतीने एका कंपनीला दिली आहे. परंतू मेहतर सफाई कामगार संघटना न्यायालयात गेल्याने त्यांनाच पूढील सुनावणी पर्यंत हा ठेका राहणार असून स्वच्छता गृहा समोर लावण्यात आलेला निशुल्क सेवा हा फलक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.