दारव्हा,
tribal-day-celebrated-in-darwha जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष दिनेश अंबुरे उपस्थित होते. कार्यक्रमाला पुष्पा ससाणे, नप अध्यक्ष सुनील चिरडे, मनोज सिंगी, संतोष ढोके, अश्विनी कुळसंगे, राधा थरकडे, संतोष येरमे, शंकर पखमोडे, निळकंठ मिरासे, रेखा दावणे, मंजली साखरकर, राजेश ससाणे, कोंडबा साखरकर, हेमंत अगलदरे, सुरेश खटारे, किशोर राठोड, संजय जाधव, संतोष यडमे, अर्जुन जाधव तसेच विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आदिवासी समाजातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन परशुराम टेकाम यांनी केले.