सतर्क राहा, काळजी घ्या...

७ महिन्यांत ३६१ लोक सर्पदंश

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
भंडारा,
361 people bitten by snakes in 7 months पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना वाढतात. अनेकांचे जीवही यात जातात. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत घडलेली घटना तर चिंता वाढविणारीच आहे. मागील सात महिन्यात ३६१ जणांना सापाने चावा घेतला आहे. यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण घटनांमध्ये सर्वाधिक 147 सर्पदंशाच्या घटना जुलै महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात घडल्या आहेत.
 
 
361 people bitten by snakes in 7 months
 
मुसळधार पावसामुळे सापांच्या बिळांमध्ये पाणी साचल्याने ते सुरक्षित व कोरड्या जागांच्या शोधात बाहेर पडतात. तसेच बेडूक आणि उंदरांची संख्या वाढल्याने त्यांच्या अन्नाच्या शोधात साप निवासी भागात आणि शेतांकडे मोर्चा वळवतात. भंडारा जिल्ह्यात मागील जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीचा विचार करता एकूण 361 साप चावल्याच्या घटना घडल्या. यात तीन जणांना जीव कमवावे लागले.
 
 
जानेवारी महिन्यात एकूण 19, फेब्रुवारी 23, मार्च 35, एप्रिल 27, मे 51, जून 59 आणि जुलै महिन्यात 147 जणांना सापाने चावा घेतला. पावसाळा आणि शेतीचा हंगाम अशा स्थितीत जुलै महिन्यात सर्वाधिक घटना घडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पावसाळ्यात सापांची हालचाल वाढते, त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. रात्री बाहेर पडताना टॉर्च आणि बुटांचा वापर करावा. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णाला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जावे. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे जीव वाचू शकतो, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
 
 
साप चावल्यानंतर मांत्रिक किंवा घरगुती उपाय याकडे कधीकाळी अधिक कल असायचा. मात्र आता वैद्यकीय उपचाराचे महत्त्व पटल्याने साप चावण्याच्या घटना घडूनही मृत्यूच्या प्रमाणात घट झाली. मांत्रिक किंवा झाडफूक करणाऱ्यांकडे जाण्यात वेळ वाया घालवू नका, हे जीवघेणे ठरू शकते. सर्पदंश झाल्यास त्वरित १०८ किंवा १०२ रुग्णवाहिका सेवेला संपर्क करा आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात पोहोचा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशाच्या उपचारासाठी एकूण १८९६ अँटी-स्नेक व्हेनम व्हायल्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हा साठा ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध असल्याचे समजते.