खामगाव,
sanjay gurav खामगांव तालुक्यातील व अंत्रज शिवारातील श्री अडभंगनाथ संस्थान या टेकडीवर आज दि १३ ऑगस्ट २०२६ रोजी येथील वर्ल्ड फाॅर नेचर व लाॅयन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या संयुक्त विद्यमाने सिडबाॅल बंम्बार्डीग / वृक्षबीज गोळे फेकण्यात आले. जिथे उंच पठारावर किंवा खोलगट टेकडीच्या उतारावर मनुष्य जाऊन वृक्षारोपण करून शकत नाही तथा बीजारोपन करू शकत नाही अशा वेळी वृक्षबीज गोळा तयार करून त्या उंच तसेच खोलगट भागात हे गोळे फेकण्यात येतात व त्याचा प्रत्यय पुढील कालावधीत दृष्टीस पडतो.यावेळी नीम, चिंच, बेहडा, करंज, शिंदोळी, बहावा / अमलतास, बांबू, शिवण, बाभूळ, बोरू, सिताफल अशा विविध तथा देशीवृक्ष वाणांची बीजगोळे या टेकडी परिसरात उपस्थितांच्या हस्ते फेकण्यात आली असून, खामगाव तालुक्यात वरील उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.

या उपक्रमा बद्दल व बीजारोपन तथा बीजगोळे प्रकार यावर सखोल मार्गदर्शन वर्ल्ड फाॅर नेचर फाऊंडेशन चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा वृक्षमित्र संजय गुरव यांनी उपस्थित सर्वाना केले व महत्त्व विशद करून मोठ्याप्रमाणात हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्य़ात राबविण्यात येणार अशी माहीती दिली.यावेळी लाॅयन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष लाॅ. नरेश चोपडा यांना सदर उपक्रम संपूर्ण वर्षभर संयुक्तरित्या राबविण्यात येईल अशी ग्वाही दिली.सदर उपक्रमात श्री अडभंगनाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.हरिदास महाराज खंडारे यांनी हा उपक्रम संपूर्ण भारतात राबविण्यात यावा असे आवाहन या प्रसंगी केले.या उपक्रमाचे यशस्वीते करीता प्रकाश भगत, किशोर खंडारे, रमेश हटकर यांचे मार्गदर्शन लाभले असून बीजगोळे निर्मिती करीता व बीज संकलन करीता सौ.मंगला गुरव, संदेश गुरव, गणेश कोकाटे, वीरेंद्र शाह, अजय छतवाणी, सुयोग झ॔वर, संतोष डवले, राजेश शर्मा, मनोज सुळोकार, अविनाश सोनटक्के, चंद्रकांत केडिया, जणाबापू मेहेत्रे आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.