नागपूर,
Ankur Pre School अंकुर प्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ‘दीपज्योती नमोस्तुते’ म्हणत दीपपूजन उत्साहात साजरे केले. यावेळी दिव्यांचे व प्रकाशाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगणारी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. महिला कला निकेतनमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मान्यतेने सुरू असलेल्या मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षणाच्या विद्यार्थिनींनी जीवती पूजेची कथा सांगितली.
यावेळी विविध प्रकारच्या दिव्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. अंधकार दूर करून प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या दीपज्योतीबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी आरती आठवले आणि सुनीता मुंजे उपस्थित होत्या.
सौजन्य:सुफला ताटके ,संपर्क मित्र